जालना: गोंदी पोलीस ठाण्यात दाखल पोस्को आणि ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील कुटुंबीयांना न्याय द्या:सामाजिक कार्यकर्ते हरिश रत्नपारखे
Jalna, Jalna | Apr 29, 2026 अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील फासेपारधी समाजातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे. या अत्याचारानंतर गुन्हा दाखल होऊन देखील आरोपी अद्यापही मोकाट फिरत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हरिश रत्नपारखे यांनी बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी चार वाजता दिली. आरोपींना तात्काळ अटक करून पीडितांना न्याय द्यावा, त्यांना योग्य ती मदत करण्यात यावी अशी मागणी रत्नपारखे यांनी यावेळी केली.