आदर्श स्मार्ट ग्राम पंचायत कळमना येथे पर्यावरणपूरक व समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम राखत पक्षी व त्यांच्या पिलांसाठी घरटी उभारण्याचा स्तुत्य उपक्रम आज दि 13 डिसेंबर ला 12 वाजता राबविण्यात आला. आदर्श स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून हा सौजन्यशील उपक्रम साकारण्यात आला.