नागपूर ग्रामीण: मोबाईल टॉवरचे RR Unit चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; २१ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त!
बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील एअरटेल कंपनीच्या टॉवरवरून 'आर. आर. युनिट' चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका आंतरराज्यीय टोळीचा नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून **४ आरोपींना अटक** केली असून, त्यांच्याकडून महिंद्रा थार गाडीसह **२१ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.