जालना: जालना शहरात आढळला अत्यंत दुर्मिळ आणि पांढरा रंगाचा मण्यार साप;सर्पमित्रांनी दाखवली शौर्याची चमक;पांजरापोल परिसरातील घटना
Jalna, Jalna | Oct 10, 2025 जालना शहरातील श्री गोरक्षण पांजरापोल परिसरात एक अनोखी आणि आश्चर्यचकित करणारी घटना घडली. शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गोरक्षण पांजरापोळ येथे अत्यंत दुर्मिळ आणि पांढर्या रंगाचा साप आढळून आलाय. पांजरापोळ परिसरातून एक अचानक साप फिरत असल्याची माहिती मिळताच सर्पमित्र फईम शेख आणि मयुर साबळे यांना मिळताच त्यांनी क्षणाचीही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचताच त्यांच्या नजरेस आला तो दुर्मिळ अल्बिनो मण्यार- पूर्णपणे पांढर्या रंगाचा आहे.