चांदूर रेल्वे: जुना बस स्टँड चौक येथे जेलभरो आंदोलनाला सुरुवात होताच महसूल प्रशासनाने दिले पत्र; लवकरच मानधन जमा होण्याचे आश्वासन
पोटापाण्यासाठीच्या थोडक्या मानधनाची महिन्योनमहिने वाट बघणारे वृद्ध, अपंग व निराधारांनी आज गांधी जयंतीच्या दिवशी अहिंसक मार्गाने मोठ्या हक्काच्या लढ्याला चांदूर रेल्वे शहरात सुरूवात केली होती. शासनाकडून ७-८ महिन्यांपासून रखडलेले मानधन न मिळाल्यामुळे त्रस्त झालेले श्रावणबाळ, संजय गांधी निराधार आणि अपंग योजनेतील अनेक लाभार्थ्यांचा उद्रेक चांदूर रेल्वेत झाला असुन ‘जेल भरो’ आंदोलनाची घोषणा देत आम आदमी पार्टी, शिवसेना (ठाकरे गट), भाकप, जनता दल, माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्य