हिंगोली: आदर्श कॉलेज परिसरात महासंघ दान कार्यक्रम आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत संपन्न
हिंगोली दि. 18 ऑक्टोबर रोजी हिंगोली शहरातील आदर्श कॉलेज परिसरात आज महासंघ दान कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी दुपारी बारा वाजता विशेष उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने भिक्खू संघाच्या भंतेजिंची उपस्थिती लाभली होती. तसेच महिलांचा देखील लक्षणीय सहभाग या ठिकाणी पहावयास मिळाला.