उत्तर सोलापूर: ग्रामीणमध्ये उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गौरव...
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सन 2025 दरम्यान सोलापूर ग्रामीण हद्दीतील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पारितोषीक देऊन गौरवण्यात आले. या वर्षी एकूण 3018 परवाना धारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना केली, ज्यात 251 एक गाव एक गणपती उपक्रम राबवणारी मंडळे होती. पर्यावरण पूरक मूर्ती बसवणे, पारंपरिक वाद्यांचा वापर करणे, ध्वनी प्रदूषण टाळणे, वृक्षरोपण, आरोग्य व रक्तदान शिबिर, सामाजिक उपक्रम राबविणे आदी उपाययोजना सुचविले.