सीकेटी विद्यालयात सातवीमध्ये शिकणारा क्रिकेटपटू अनुज संतोष निवाते याने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात क्रिकेटच्या मैदानावर देदीप्यमान कामगिरी करत थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. अनुजने गेल्या वर्षभरात विविध प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये आपल्या अष्टपैलू कौशल्याच्या जोरावर अनेक पुरस्कारांवर नाव कोरले असून त्याच्या या यशाने पनवेलच्या क्रीडा क्षेत्रात कौतुकाचा वर्षाव होत आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अनुज चे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.