कानळदा रोडवरील लक्ष्मी नगर येथे काहीही कारण नसतांना एका तरूणाला शिवीगाळ करत डोक्यात काचेची बाटली टाकून जखमी केल्याची घटना मंगळवारी ९ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत बुधवारी १० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.