नागपूर शहर: भरधाव टिप्परची दिघोरी टोलनाक्यावरील केबिनला व सर्वर रूमला धडक ; 42 वर्षीय इंचार्जचा जागीच मृत्यू
दोन डिसेंबरला पहाटे चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास एका भरधाव टिप्परने थेट दिघोरी टोलनाक्यावरील केबिनला व सर्वर रूमला धडक दिली. ज्यात बूथच्या मागील लोखंडी बाकड्यावर झोपलेल्या इन्चार्ज चा जागीच मृत्यू झाला. मृतकाचे नाव नंदकिशोर साठे वय 42 वर्ष असे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी विशाल आपकाजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात टिप्पर चालका विरुद्ध विरुद्ध वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.