'सेवा पंधरवडा २०२५ - गाव भेट' मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी आज, २३ डिसेंबर रोजी दुपारी मौजा पिंडकेपार पुनर्वसन (बेला) येथे भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले; यामध्ये प्रामुख्याने मूळ शेतकरी असतानाही अनेकांना चुकीच्या पद्धतीने 'गैर-शेतकरी' म्हणून भूखंडांचे वाटप करण्यात आल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला.