बार्शीटाकळी: कान्हेरी सरप येथील पोहरे फार्म येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा
अकोला शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वेद नंदिनी येथे आज भव्य शेतकरी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यास माजी मुख्यमंत्री आणि खासदार शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री हजार हुसेन, तसेच स्थानिक अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या आयोजनाखाली पार पडला मेळाव्यात शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च वाढत असताना हमीभाव न मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.