सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल यांच्याविरोधात छत्तीसगडमधील 'जोहार पार्टी'चे प्रमुख अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जळगाव शहरातील सिंधी समाजात मंगळवारी, ४ नोव्हेंबर संतापाची लाट उसळली. समाज बांधवांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर दुपारी 3 वाजता जोरदार निदर्शने करत आपला आक्रोश व्यक्त केला.