सहा जुलैला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार नंदनवन पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवणकर झोपडपट्टी येथे छापा मार कार्यवाही करून हद्दपार आरोपी शेख शाहरुख शेख महमूद याला अटक करून त्याच्याकडून एक लोखंडी भाल्याचे पाते किंमत दोनशे रुपये जप्त करण्यात आला. आरोपीला शहरातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.