पाचोरा: वेरूळी खुर्द व बु. येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा शिवसेना तालुकाप्रमुख यांचा तहसीलदारांना फोन
पाचोरा तालुक्यातील वेरूळी खुर्द व वेरूळी बुद्रुक येथे अतिवृष्टीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीची पाहणी होऊन तात्काळ पंचनामे व्हावेत याबाबत पाचोरा तहसीलदार यांना शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे यांनी संपर्क साधत पंचनामे करून घेण्यासाठीची कार्यवाही तात्काळ करावी अशी विनंती आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास केली, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ पंचनामे करण्यात येतील असे तहसीलदार यांनी आश्वासित केले,