भोकरदन: वरुड खुर्द येथे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली मयत शेतकऱ्यांच्या घरी सांत्वन पर भेट
आज दिनांक 23 जून 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदार संघातील वरुड खुर्द येथे मयत शेतकऱ्याच्या घरी सांभात भेट दिली आहे,याप्रसंगी त्यांनी 4दिवसापूर्वी दुःखद निधन झालेले कै.भागाजी सोनुबा गाढे यांचे निधन झाले असता त्यांच्याकडे त्यांच्या परिवाराची भेट देत सांत्वन केले आहे, याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व गाढे परिवारातील सदस्य उपस्थित होते.