अकोट: पोपटखेड मार्गावरील दहीखेल फुटकर फाट्याजवळ दुचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी
Akot, Akola | Nov 7, 2025 अकोट पोपटखेड रोड मार्गावरील दहीखेल फुटकर फाट्याजवळ शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती असून गंभीर महिलेस प्रथमोचारासाठी पोपटखेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले.या ठिकाणी प्रथम उपचार नंतर सदर महीलेस आकोट रवाना करण्यात आले मात्र डोक्याला मोठ्या प्रमाणावर गंभीर जखमी असल्याने या महिलेस पुढील उपचारार्थ अकोला रवाना करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे.