अहमदपूर: काळेगाव साठवण तलावात मौजे नांदुरा बुद्रुक येथील ८० वर्षीय ज्ञानोबा जटूरे यांचा तिसऱ्या दिवशी शोध सुरू
Ahmadpur, Latur | Sep 29, 2025 अहमदपूर तालुक्यातील मौजे नांदुरा बुद्रुक येथील वयोवृद्ध नागरिक ज्ञानोबा रामा जटुरे वय वर्ष 80 दिनांक 26 सप्टेंबर वार शुक्रवार रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजता घराबाहेर पडले तेव्हापासून बेपत्ता असल्याची नागरिकांकडून माहिती देण्यात येत आहे.दिनांक 26 व 27 रोजी नांदुरा बुद्रुक येथील गावकरी व घरच्यांकडून सदरील इसमाचा शेतशिवारात गावात पाहुणेरावण्यांकडे शोध घेण्यात आला मात्र अद्याप कुठेही आढळून न आल्याने वाकी नदीत वाहून आल्याचा अंदाज व्यक्त करीत प्रशासनाला याची माहिती दिली .