सेनगाव: झेंडूच्या फुलांना योग्य भाव न मिळाल्याने नागा सिनगी येथील शेतकऱ्यांने फिरवला झेंडूच्या बागेवर रोटावेटर
सेनगांव तालुक्यातील नागा सिनगी येथील शेतकऱ्यांने चक्क झेंडूच्या फुलांना योग्य दर मिळाल्याने झेंडूच्या बागेवर रोटावेटर फिरवला आहे. नागासिनगी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली होती मात्र अतिवृष्टीमुळे झेंडू पिकाचे मोठे नुकसान झाले होते. तर दसरा दिवाळी आणि कार्तिकी पौर्णिमेला देखील झेंडूच्या फुलांना योग्य भाव न मिळाल्याने हतबल झालेल्या नागा सिनगी येथील कांबळे कुटुंबीयांनी आपल्या झेंडूच्या बागेवर रोटावेटर फिरवला आहे.