हिंगोली: एनटीसी परीसरात जिव्हाळा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गरजू महिलांना मदतीचा हात
आज दिनांक १५ ऑक्टोबर, बारा वाजण्याच्या सुमारास हिंगोली येथील एनटीसी परिसरात जिव्हाळा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले. समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी संस्थेने घेतलेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद मानले जात आहे