दर्यापूर: शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष;पठाणपुरा येथील व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक
ऑनलाइन गुंतवणुकीचे खोटे आमिष दाखवून पठाणपुरा दर्यापूर येथील व्यक्तीला तब्बल ४८,५०४ रुपयांनी लुबाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी ११ वाजता उघडकीस आला आहे. या प्रकरणी दर्यापूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सय्यद नावेद सय्यद बासीत (वय ४३वर्ष, रा. पठाणपुरा, दय्यापुर) यांना दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मोबाईल नंबर वर फोन करुन एका इसमाने शेअर मार्केटचा अनुभव असल्याचे सांगून फिर्यादीची फसवणूक केली.