तेल्हारा येथे सुरू असलेल्या शताब्दी महोत्सवानिमित्त आज ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज (बुलढाणेकर) यांचे जाहीर हरिकीर्तन मोठ्या भक्तिभावात संपन्न झाले. बंसिधर विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या हरिकीर्तन सोहळ्यास पंचक्रोशीतील सुमारे पंधरा हजारांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. विशेषतः महिला भाविकांसाठी स्वतंत्र सूचना व व्यवस्था करण्यात आली होती. शताब्दी महोत्सवातील हा कार्यक्रम पुष्प चौदावा ठरला.