चंद्रपूर: लोकाभिमुख प्रशासनासाठी गांभीर्याने काम करा;
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री बावनकुळे यांचे यंत्रणेला निर्देश
राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत महसूल विभागातर्फे सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतरस्त्यांचे मॅपिंग करणे, त्यांचे अतिक्रमण काढणे, राष्ट्रीय महामार्ग प्रमाणे रस्त्यांना क्रमांक देणे, सर्वांना घरे आदी बाबी करण्यात येणार आहे. महसूल खाात्याबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना आहे. त्याला तडा जाऊ देऊ नका. लोकाभिमुख प्रशासनासाठी अतिशय गांभिर्याने काम करा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दि 20 सप्टेंबर ला 2 वाजता यंत्रणेला दिले.