नांदेड: नांदेड मध्ये झालेल्या मोठ्या घरकुलच्या छडा स्थानीय गुन्हे शाखेने लावला असून तीन आरोपीसह 35 लाख रुपयांचा मुद्देमाल
Nanded, Nanded | Sep 15, 2025 पद्मजा सिटी या उच्चभ्रू सोसायटीमधील डॉक्टर बन्सल यांच्या घरी 14 ऑगस्ट रोजी घरी कोणीही नसताना चोरट्यानी डाव साधला होता. तब्बल 30 लाख रुपये रोख आणि 24 तोळे सोने चोरट्यानी लंपास केले होते. आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी स्थानीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नांदेड शहरामधूनच तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता घरफोडीचा उलगडा झाला. आरोपी शेख शफी उर्फ शफी बिल्डर, शेखआमेर आणि नंदकिशोर देवसरकर या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख 11 लाख 37000 रुपये आणि 14. 5 तोळे सोने हस्तगत करण्यात आले