नेरळ पर्यटकांची लाडकी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन प्रवासी सेवा तब्बल २० दिवसांनंतर शुक्रवार ६ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. या निर्णयामुळे माथेरानमधील पर्यटन व्यवसायाला गती मिळणार आहे. दरम्यान, या मार्गावर दोनच प्रवासी फेऱ्या होणार असल्याने प्रवासी फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी पूर्ण झालेली नाही. पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या भीतीने मिनी ट्रेन सेवा १५ जून ते १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवली जाते.