जालना: कर्जमाफीवरील अटी रद्द करा; 29 जूनला छत्रपती संभाजीनगरात शेतकर्यांचा आक्रोश मोर्चा : आमदार रोहित पवार
Jalna, Jalna | Jun 27, 2026 कर्जमाफीच्या निर्णयामध्ये सरकारने घातलेल्या अटी तातडीने रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी येत्या 29 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शेतकर्यांचा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली. शनिवार दि. 27 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ते जालना येथील एका कार्यक्रमात बोलत होते. पंढरपूर येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनावेळी सरकारचे प्रतिनिधी तथा मंत्री गिरीश महाजन यांनी अधिवेशनापूर्वी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते.