जिल्हा परिषद गोंदिया येथे अटल जिल्हा व क्रीडा महोत्सव तसेच तालुका व जिल्हा स्तरीय महोत्सवाविषयी सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये अटल क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व कार्यक्रम नियोजनबद्ध,शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे पार पडावेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या.यावेळी जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर,सुरेश हर्षे, उपाध्यक्ष,जिल्हा परिषद गोंदिया,जनार्दन खोटरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, आदी उपस्थित होते