राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी महायुतीतील घटक पक्षांवर जोरदार टीका केली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत असूनही, भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात निवडणुकीच्या वेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून जनतेचे मत मिळवण्याकरिता दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप वाघमारे यांनी केला आहे. "हे रात्री नाटक करतात व दिवसा हात मिळवतात. निवडणुका लागल्यावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात आणि निवडणुका संपल्या