लोहा: नांदेड लोहा मार्गांवरील कारेगाव येथे मोठ्या शिडीचा विद्युत तारेला स्पर्श होऊन एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी
Loha, Nanded | Oct 27, 2025 नांदेड लोहा मार्गांवरील कारेगाव येथील गुरुद्वारा जवळ मोठी रोडवरून घेऊन जात असताना रोड वरून असलेल्या उंचीवर असलेल्या विदयुत तारांना सदरची शिडी लागून स्पार्क होत आग लागून त्यात एकाचा मृत्यू तर इतर तिघेजण जखमी झाल्याची माहिती आजरोजी दुपारी 4:30 च्या सुमारास प्राप्त झाली आहे. ह्यामध्ये एका व्यक्तीचा शॉक लागून त्यांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला होता ह्या मयताचे नाव गजानन भोसकुटे असल्याचे समजते आहे. सदर घटना घडताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले होते.