जालना: सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांवर हल्ला प्रकरणी वकील संघाकडून निषेध, आरोपी वकिलाची सनद जप्त करण्याची मागणी
Jalna, Jalna | Oct 8, 2025 देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा. भुषण रामकृष्ण गवई यांच्यावर 6 ऑक्टोबर 2025 रोजी न्यायालय परिसरात झालेल्या कथित जातीवादी हल्ल्याचा जालना जिल्हा वकील संघाने बुधवार दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जिल्हाधिकारी मार्फत भारताचे राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या निवेदनाद्वारे संघाने आरोपी वकिलाची सनद तत्काळ जप्त करण्याची, तसेच त्याच्यावर मानहानी, देशद्रोह, ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत आणि रासुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.