आजाद समाज पार्टी बहुजन, दलित, आदिवासी, शोषित व मजूर वर्गावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात लढा उभारणार असल्याचे प्रदेश महासचिव दत्ताजी धांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शासकीय विश्रामगृहात दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता झालेल्या या परिषदेत प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे, विदर्भ महासचिव प्राचार्य विठ्ठल खाडे आदी उपस्थित होते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, मनपा निवडणुकांत पक्ष ताकदीने उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात आले. विजय नरवाडे यांची अकोला जिल्हाध्यक्ष