सातारा: नादुरुस्त बसमुळे प्रवाशांचे सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर हाल; आठ तासांचा प्रवास सोळा तासांतही अपुरा
Satara, Satara | Oct 31, 2025 इचलकरंजीहून मुंबईकडे निघालेल्या खाजगी बसने प्रवाशांचे अक्षरशः हाल केले. गुरुवारी रात्री साडेआठ वाजता सुटलेली ही बस मध्येच नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना रात्रभर बसमध्येच ताटकळत बसावे लागले. अखेर प्रवाशांनी ही बस शुक्रवारी पहाटे सातारा शहर पोलीस ठाण्यात आणत तक्रार नोंदवली. सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत प्रवासी पोलीस ठाण्यातच थांबले होते. प्रवाशांनी तक्रार दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने हा विषय आरटीओ कार्यालयाच्या अखत्यारीत असल्याचे सांगून जबाबदारी झटकली.