वाडा: खानिवली परिसरात दुचाकीची चोरी; गुन्हा दाखल
Vada, Palghar | Nov 16, 2025 वाडा पोलीस ठाणे हद्दीतील खानिवली परिसरात दुचाकीची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. कौशल वर्तक यांनी त्यांची 2 लाख 17 हजार रुपये किमतीची दुचाकी घरातील अंगणात उभी करून ठेवली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरली आणि चोरटा पसार झाला आहे. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.