स्वाभिमानी शेतकरी संघटना व किसान सभेच्या वतीने सोनपेठ तालुक्यातील ट्वेंटीवन शुगर सायखेडा कारखान्यावर डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी कारखान्याचे गेट तोडून कारखान्यात प्रवेश केला. कारण कारखान्याने बाउन्सर शेतकऱ्यांच्या अंगावर पाठवल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे गेट तोडले. कारखान्याने बाउन्सर शेतकऱ्यांच्या अंगावर पाठवल्या बद्दल राजु शेट्टी यांची संतप्त प्रतिक्रिया