रामटेक: गडमंदिर रामटेक येथे राम नवमीला राम जन्मोत्सव उत्साहात साजरा ; रामसृष्टी व कालिदास सृष्टी साठी 25 कोटी रु.चा निधी मंजूर
Ramtek, Nagpur | Mar 26, 2026 प्रसिद्ध गड मंदिर रामटेक येथील राम मंदिरात राम नवमी निमित्य गुरुवार दि. 26 मार्चला दु.12 वाजता पासून राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडवा पासून नवरात्री पर्व सुरू झाले.येथे घटस्थापना झाली. नऊ दिवस रोज परंपरागत विधी पूजा पाठ करण्यात आले. परंपरेनुसार राम नवमीला राम जन्मोत्सव साजरा होतो. त्यामुळे गुरुवारला सकाळपासूनच मंत्रोपचारात विशेष पूजा अर्चना करण्यात आली.. मूर्तीचे अभंग स्नान करून श्रीराम सीता, लक्ष्मण, हनुमान या सर्व मंदिरात पूजा पाठ करण्यात आला.