यवतमाळ: चिमुकल्यांची अनोखी मतदान जनजागृती – योगासनातून समाजाला संदेश
भाऊसाहेब देवराव पाटील उच्च प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीचा उत्सव जपवत मतदारांना जागृत करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतलाय. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव” या घोषणेसह विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे सादरीकरण करत सर्व नागरिकांना मतदानात सक्रीय सहभागाचे आवाहन केलं. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावावा… यासाठी योगाच्या माध्यमातून केलेली ही जनजागृती समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.