गुप्तधनाच्या लालसेपोटी आरमोरी तालुक्यातील वैरागड गावात किल्ल्याजवळ पुन्हा एकदा अज्ञातांनी खोदकाम केल्याची धक्कादायक घटना आली आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजालगत टोकावरील बुरुजाजवळ चार पाच दिवसांपूर्वी हे खोदकाम झाले असून, परिसरात खळबळ उडाली आहे. दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी मोठ्या चाफ्याच्या झाडाजवळही गुप्तधनाच्या शोधात खोदकाम करण्यात आले होते.ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या वैरागड परिसरात किल्ला, भंडारेश्वर, गोरजाईसह हेमाडपंती देवळांचा मोठा ठेवा आहे.