जालना: कचर्याच्या गाडीतून युवकाचा मृतदेह; प्रशासनाच्या कारभारावर संताप; शववाहिका असतानाही मृतदेहाची विटंबना
Jalna, Jalna | Jun 7, 2026 परतूर शहरात एका युवकाचा मृतदेह नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणार्या वाहनातून शवविच्छेदनासाठी नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार दि. 7 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकारामुळे पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदार तसेच असंवेदनशील कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हिरालालनगर परिसरातील रहिवासी सुरेश ढाकरगे हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नी उषा ढाकरगे यांनी 2 जून रोजी मिसिंग दाखल केली होती.