नागपूर ग्रामीण: विदर्भातील शाळा आता ३० जूनपासून सुरू होणार; नागपूर खंडपीठाचा मोठा दिलासा : विजय कोंबे, राज्य कार्याध्यक्ष
विदर्भातील वाढत्या तापमानाचा विचार करता, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे. विदर्भातील शाळा आता २२ जूनऐवजी ३० जूनपासून सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना विजय कोंबे (राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती)यांनी समाधान व्यक्त केले आहे.