उत्तर सोलापूर: लष्कर परिसरातील लोधी गल्ली येथे साडीच्या तुकड्याने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या: सिव्हिल पोलिसांची माहिती...
लष्कर परिसरातील लोधी गल्ली येथील १४ नंबर शाळेजवळ राहणाऱ्या एका तरुणाने साडीच्या तुकड्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ७.३० वाजता उघडकीस आली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तरुणाने राहत्या घरात अज्ञात कारणावरून आत्महत्या केली. घरातील सदस्यांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तत्काळ नातेवाइकांनी पोलीस हवालदार गायकवाड यांच्या मदतीने त्याला गळफासातून सोडवून सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.