दिग्रस: नगर परिषद निवडणुकीत उमेदवारीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या इच्छुकांची खासदार देशमुख यांच्या चिंचोली येथील निवासस्थानी गर्दी
येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या दिग्रस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून नगराध्यक्ष तसेच २५ नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिग्रस तालुक्यातील चिंचोली क्र. २ येथील खासदार संजय देशमुख यांच्या निवासस्थानी आज दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री११ वाजताच्या दरम्यान झाली. नगर परिषद दिग्रसचा आतापर्यंतचा राजकीय इतिहास पाहता, खासदार संजय देशमुख यांचा येथे मजबूत ताबा राहिलेला आहे.