चोपडा: चोपडा तालुक्यातील भार्डू येथे विषारी द्रव्य प्राशन करून इसमाची आत्महत्या, चोपडा ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
चोपडा तालुक्यात भार्डू हे गाव आहे. या गावातील रहिवाशी डेकल्या सोलंकी वय ५६ याने कसले तरी विषारी औषध प्राशन केले होते. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.