नागपूरमधील हुडकेश्वर आऊटर रिंगरोडवर टोमॅटो भरलेल्या एका ट्रकला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, ट्रक मधील टोमॅटोची मोठी खेप रस्त्यावर विखुरली गेली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले.