आज दि ५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता माहिती मिळाली की खुलताबादमध्ये सोशल मीडियावर अचानक अफवा पसरली की स्ट्राँग रूममधून पोलिस मतपेट्या नेत आहेत. ही चर्चा काही मिनिटांत नागरिकांसह नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांपर्यंत पोहोचली आणि सर्वजण थेट पोलिस ठाण्यात दाखल झाले. मात्र चौकशीअंती सत्य स्पष्ट झाले — त्या बॅगा मतपेट्या नव्हे तर ड्युटी संपल्यानंतर पोलिसांच्या वैयक्तिक कपड्यांच्या बॅगा होत्या. अफवा मोठी होती, पण कारण अगदी साधे!