जळगाव: सरदार पटेल जयंतीनिमित्त लेवा भवनात सर्वपक्षीय नेत्यांकडून पुतळ्याला माल्यार्पण
अखंड भारताचे शिल्पकार आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता जळगाव शहरात एकतेचे आणि आदराचे वातावरण पाहायला मिळाले. पटेल लेवा भवनात आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय मान्यवर आणि लेवा पाटीदार समाज बांधवांनी एकत्र येत सरदार पटेल यांच्या कार्याला अभिवादन केले. लेवा भवन येथे आयोजित या कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण करण्यात आले.