राज्यभरात “अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान” 15 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागामार्फत घरोघरी गृहभेटी देऊन सिकलसेलग्रस्त नागरिकांची संपूर्ण वैद्यकीय माहिती संकलित करण्यात येणार आहेया अभियानात सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, विशेषतः विवाहयोग्य व किशोरवयीन मुला-मुलींना योग्य मार्गदर्शन मिळावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उषा कवरासे यांनी केले आहे.