रामटेक: देवलापार परिसरात सर्रास होत आहे रेतीची तस्करी; रस्त्याच्या बाजूला दिसते फेकलेली रेती
Ramtek, Nagpur | Mar 27, 2026 रामटेक तालुक्यातील देवलापार वनक्षेत्रातील नदी नाल्यातून तसेच बावनथडीच्या लोधा घाट येथून वैध रेतीसह अवैधरीत्याही रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती शुक्रवार दिनांक 27 मार्चला समोर आली आहे. वाहतूक होणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी रेती फेकलेल्या अवस्थेत दिसून आली. यामुळे या प्रकाराची चौकशी करून यावरून नियंत्रण मिळवावे अशी मागणी गावकरी करीत आहेत.