ठाणे: पातलीपाडा ब्रिज जवळ कारचा अपघात
Thane, Thane | Sep 27, 2025 आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास पातलीपाडा ब्रिज जवळ एक भीषण अपघात झाला आहे. पातलीपाडा ब्रिजजवळ डीवाईडरवर गाडी आदळली आहे. या अपघातामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. या अपघातामुळे ठाण्यातील घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.