शहरातील सोमेश्वर नगर परिसरात मुख्य रस्त्याचे काम रखडले
Beed, Beed | Nov 28, 2025 बीड शहरातील सोमेश्वर नगर परिसरात मुख्य रस्त्याचे काम सुरू असून, त्यामुळे स्थानिक लहान व्यवसायिकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.हे काम पूर्ण करण्यासाठी महिनाभर लागेल, असे इंजिनिअर राजेंद्र भोपळे यांनी सांगितले. मात्र रोजंदारीवर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी शुक्रवार दि 28 नोव्हेंबर रोजी, दुपारी 2 वाजता, आर्थिक अडचणींचा मुद्दा उपस्थित केला आहे.दरम्यान रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी व्यावसायिक नागरिकांनी केली आहे.