गोंदिया: ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार विद्यार्थी ठार कोहमारा वडसा मार्गावरील घटना एकुलता एका मुलाचे अपघाती निधन
Gondiya, Gondia | Oct 18, 2025 भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी चालक विद्यार्थी ठार झाल्याची घटना 16 ऑक्टो.रोजी दु.चार वाजता कोहमारा वडसा मार्गावरील खामखुर्रा ते महागाव फाटाजवळ घडली शिवम फाल्गुन नखाते वय 16 वर्ष रा.खामखुर्रा असे अपघातात निधन झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार शिवम हा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुर्रा येथील ज्ञानगंगा विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होता गुरुवारी दुपारी शिवम सराव परीक्षेचा पेपर देऊन घरी आला यानंतर तो घरातून दुचाकी क्रमांक एम एच 35 व्ही 5734 ने महागाव येथे ज